अप्पर तापी प्रकल्प हतनूर सार्वजनिक प्रयोजनासाठी शेतकऱ्यांना अद्यापही जमिनीचा मोबदला नाही.

अपनी भाषा में पढ़े! Translate

अप्पर तापी प्रकल्प हतनूर सार्वजनिक प्रयोजनासाठी शेतकऱ्यांना अद्यापही जमिनीचा मोबदला नाही.

 

अमळनेर : विक्की जाधव.

अप्पर तापी प्रकल्प हतनूर जळगाव येथील जमिनी सार्वजनिक प्रयोजनासाठी संयुक्त मोजणी नुसार संपादित करून संबंधित शेतकऱ्यांना अद्यापही जमिनीचा मोबदला तीन दशकापासून शासनाने दिलेला नाही. जिल्हा भूसंपादन अधिकारी व तापी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता हे शेतकऱ्यांना टोलवा टोलवी करीत असल्याने चोपडा तालुक्यातील अनवर्दे खु. येथील शेतकरी कार्यकारी अभियंता निम्न तापी प्रकल्प कार्यालयाच्या समोर दोन दिवसांपासून आमरण उपोषणासाठी बसलेले आहे. सदर उपोषणास पाडळसरे धरण जन आंदोलन समितीच्या पदाधिकारांनी भेट घेऊन पाठिंबा दिला आहे.

अनवर्दे ता.चोपडा येथील ७७ शेतकऱ्यांच्या जमिनी अप्पर तापी प्रकल्प हतनूर करिता संयुक्त मोजणी नुसार संपादित करण्यात आलेल्या होत्या.सदर जमिनी संपादित होऊन पाटाच्या पाण्याचा लाभ घेतला जात आहे. मात्र संबंधित शेतकऱ्यांना मात्र तीन दशकांपासून संपादित जमिनीचा पारदर्शक व संपूर्ण मोबदला मिळालेला नाही. हातेड खुर्द,बुधगाव, अनवर्दे खु शिवारातील शेतकरी गेल्या ३० वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करत असून त्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्याने या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी उमराव भाऊराव बोरसे हे आमरण उपोषणाला १० सप्टेंबर पासून बसलेले आहे. उपोषणकर्त्यांचा उपोषणाचा आज दुसरा दिवस असून याबाबत संबंधित कार्यालयाकडून कोणतेही सकारात्मक कार्यवाही अजूनही झालेले नसल्याने पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे पदाधिकारी सुभाष चौधरी, अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे , सुनिल पाटील, रामराव पवार, उर्वेश साळुंखे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आंदोलन स्थळी त्यांना पाठिंबा दिला तर याबाबत कार्यकारी अभियंता श्री. कडलग यांची भेट घेऊन सदर प्रश्नात लक्ष घालून संबंधित शेतकऱ्यांना न्याय देण्याची विनंती केली आहे.

आंदोलन स्थळी पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे महेंद्र बोरसे यांचे सह अन्यायग्रस्त शेतकरी रामराव बोरसे, रवींद्र बोरसे, जगतराव बोरसे, तुषार बोरसे ,श्रीराम बोरसे ,धनराज बोरसे, अरुण बोरसे ,रखमाबाई बोरसे, शशिकांत बोरसे, निंबाजी पाटील, जगतराव भटा पाटील ,निंबा बोरसे ,हिरामण कोळी ,भूषण बोरसे, नितीन गोसावी, दीपक धनगर ,कैलास शिरसाट, रवींद्र बोरसे, लोटन बोरसे, मुकेश बोरसे, राजेंद्र घिसाडी, श्रीराम बोरसे, धनंजय साळुंखे,शरद बोरसे, सुरेश गोसावी, राजेंद्र पाठझड आदींनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!