वेश्याव्यवसाय, मटका जुगार, गुटखा हे व्यवसाय भिगवन ची नासाडी करत आहे; आणि या सर्व व्यवसायांना कोणाचा आशीर्वाद आहे?

अपनी भाषा में पढ़े! Translate

वेश्याव्यवसाय, मटका जुगार, गुटखा हे व्यवसाय भिगवन ची नासाडी करत आहे; आणि या सर्व व्यवसायांना कोणाचा आशीर्वाद आहे?

(निलेश गायकवाड)

वेश्याव्यवसाय भिगवण परिसरातील हॉटेल मध्ये सुरू याला कोणाचे अभय…?

वर्षानुवर्ष हाच प्रश्न प्रत्येक वेळी भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील असलेल्या हॉटेल व्यवसायिकांकडून वेश्याव्यवसाय जोमात सुरू असतो. तात्पुरत्या प्रकारची कारवाई दाखवण्यासाठी केली जाते आणि पुन्हा तेच भिगवणकरांच्या पदरी पाहायला मिळते. याला काय म्हणायचं कुठेतरी अशा अवैधरित्या व समाजाला हानिकारक होणाऱ्या गोष्टींपासून कधी सुटका मिळणार हे भिगवन वेश्याव्यवसाय पासून कधी मुक्त होणार हा सर्वसामान्याला पडलेला प्रश्न आहे… आणि तसेच याला अभय देखील कोण देत आहे हा देखील मोठा प्रश्न आहे…?

 

गुटखा राजरोसपने विक्री… कोणाचे अभय ?

पुणे जिल्ह्यात तंबाखू, गुटखा विक्री बंदीचा कायदा नावालाच दिसून येत आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस स्टेशनं हद्दीतीत खुलेआम पानटपऱ्यांवर तंबाखू व गुटख्याची विक्री होत आहे. एवढेच नव्हे तर शाळा परिसरालगत ही दुकाने खुलेआम सुरू आहेत. त्यामुळे प्रशासन धडक मोहीम राबविणार काय, असा प्रश्न आहे.

राज्यात २० जुलै २०१२ रोजी गुटखा बंदीचा निर्णय झाला. त्याला तेरा वर्षे पूर्ण झाली; पण ना त्याची कडक अंमलबजावणी झाली, ना गुटखा विक्री थांबली. शहर किंवा ग्रामीणमधील पानटपरी, दुकानांमध्ये गुटख्याची विक्री होत आहे. गुटखा विक्री होत असतानाही कारवाई होताना दिसत नाही. आंतरराज्यीय सीमांवर पोलिसांचे तपासणी नाके असतानाही गुटखा येतोच कसा, या प्रश्नाचे ठाम उत्तर अधिकारी देऊ शकत नाहीत.भिगवण पोलीस स्टेशनं च्या हद्दीत तर राजरोसपाने गुटखा विक्री सुरु असल्याने पोलिसांचा धाक राहिला का नाही असा प्रश्न पडलाय…?

जुगार, मटका खुलेआम सुरू असल्याने प्रशासनाचे यावरती नियंत्रण आहे का नाही असा प्रश्न आहे… याला कोण अभय देते आहे..?

भिगवन मध्ये खुलेआम अैवेद्यरीत्या जुगार अड्डे हे कोणाचीही भीती न बाळगता खुलेआम सुरू आहे. हे जुगार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे यामध्ये कोणाचा हात आहे किंवा याला कोण पाठबळ देत आहे हा देखील मोठा पडलेला प्रश्न सर्वसामान्य आहे..?

भिगवन सारखे गाव आणि या गावातील लोक या आशेवरती जगत आहेत आपले गाव शिक्षण रस्ते आरोग्य सामाजिक उपक्रम इत्यादी सर्वसामान्यांना त्याचा उपभोग घेता येईल व जीवन सुखमय होईल ही कुठेतरी भोळीभाबडी अशा या सर्वसामान्यांना लागली आहे. पण या भिगवणला कोणाची नजर लागली आहे या भिगवणचं वैभव संपत चालले आहे का? या भिगवन ची नासाडी कोण करत आहे का? या भिगवणला बदनाम करण्याचा कोण प्रयत्न करत आहे का? किंवा या भिगवणला हे अवैध्य रित्या सुरू असलेले व्यवसाय बंद करण्यासाठी प्रशासन कमी पडत आहे का? असे नानाविविध प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. हे सुरू असलेले अवैध्य व्यवसाय कायमचे बंद होऊन भिगवनची यामधून सुटका असा प्रश्न पुढे येत आहे…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!