धुळे जिल्हा भाजपतर्फे विशेष सेवा पंधरवाडा विभागीय कार्यशाळा संपन्न…

पंतप्रधान तथा प्रधान सेवक ना.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे विशेष “सेवा पंधरवाडा” साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त आज धुळे शहरातील भाजप कार्यालयात विभागीय कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळेला धुळे जिल्हा ग्रामीण, धुळे महानगर,नंदुरबार व मालेगाव येथील प्रमुख पदाधिकारी, सेवा पंधरवडा समिती,मंडळ अध्यक्ष व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन मुख्य संयोजक आ. मंगेश चव्हाण यांनी केले. तसेच या कार्यक्रम प्रसंगी प्रदेश संघटन सरचिटणीस श्री विजय भाऊ चौधरी तसेच प्रदेश संघटन मंत्री श्री रवींद्रजी अनासपुरे साहेब,माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, आ.अनुप अग्रवाल, आ. राजेश पाडवी, माजी आ. राजवर्धन कदमबांडे, धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापूसाहेब रामकृष्ण खलाणे ,धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, मालेगांव जिल्हाध्यक्ष निलेश कचवे,नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, यांसह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.
विभागातील जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा संघटन सरचिटणीस,जिल्हा सरचिटणीस, जिल्हा चिटणीस, जिल्हा कोषाध्यक्ष, सेवा पंधरवाडा समिती, मंडल अध्यक्ष,
यांच्यासह विविध मोर्चा व आघाडींचे पदाधिकारी कार्यशाळेत सहभागी झाले.
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता यांच्या जयंतीनिमित्त या पंधरवड्यात स्वच्छता अभियान, युवा मॅरेथॉन स्पर्धा, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
👉 आ. मंगेश चव्हाण यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार जनतेची सेवा हीच खरी आपली साधना असली पाहिजे. अशी माहिती भाजपा धुळे जिल्हा ग्रामीण प्रसिद्धी व माध्यम प्रमुख जितेंद्र जैन बंब यांनी दिली..