एसपीडीएम महाविद्यालयाच्या स्व . गौरव देसलेच्या कुटुंबियांना पाच लक्ष दहा हजाराचा धनादेश प्रदान
बोराडी – शिरपूर :कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने अकस्मात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचा विमा काढला जातो . विद्यार्थी अपघात सुरक्षा योजने अंतर्गत कुटुंबीयांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने ओरिएंटल विमा कंपनीकडून ही मदत मिळवून देण्यासाठी विद्यापीठ प्रशासन पुढाकार घेते . किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एसपीडीएम कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिरपूरच्या द्वितीय वर्ष बीसीए या वर्गातील गौरव अमृत देसले या विद्यार्थ्यांचा नुकताच दुर्देवी अपघाती मृत्यू झाला .विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत मिळावी म्हणून संस्थेचे सचिव व विद्यापीठाचे सिनेट सदस्य निशांत रंधे ,महाविद्यालयाचे प्राचार्य व विज्ञान तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य एस एस राजपूत यांनी विद्यापीठाकडे विशेष पाठपुरावा करून तातडीने मदत मिळवून दिली . विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना रुपये पाच लाख दहा हजार (५,१०,००० ) मदतीचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष डॉ . तुषार रंधे , सचिव नानासो निशांत रंधे , विश्वस्त रोहित रंधे ,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो एस एस राजपूत उपप्राचार्य डॉ . डी डी भक्कड उपप्राचार्य डॉ . ए एम देशमुख प्रा विलास चव्हाण बीसीए विभागाचे प्रमुख प्रा .संदीप सोलंकी , विद्यार्थी विकास विभागाचे प्रा राकेश वाघ व विविध प्राध्यापकांच्या उपस्थितीत सदर विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात आला .
विद्यापीठाच्या या कल्याणकारी योजनेबद्दल कुलगुरू मा प्रा व्ही एल माहेश्वरी , प्र कुलगुरू प्रा एस टी इंगळे सचिव प्रा विनोद पाटील , एनएसएस प्रमुख प्रा डॉ सचिन नांद्रे तसेच विद्यापीठ प्रशासनाचे आभार यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ . तुषार रंधे , सचिव व सिनेट सदस्य श्री निशांत रंधे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले .
प्राचार्य एस एस राजपूत यांनी याप्रसंगी कुटुंबीयांचे सांत्वन करून विद्यापीठाच्या योजनांची माहिती दिली .