कबड्डी सामन्यात क्रांतिवीर शं.पां.माळी विद्यालयाचे यश…
बोराडी – महाराष्ट्र शासनाच्या शासकीय क्रिडा स्पर्धा नुकत्याच शिरपूर येथे संपन्न झाल्या.यात धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी,धुळे व शिरपूर तालुका क्रीडा समितीच्या शिरपूर शासकीय शालेय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत 14 वर्षाआतील मुलींचा अंतिम सामना शिरपूर येथील क्रांतिवीर शंकर पांडु माळी माध्यमिक विद्यालय वरवाडे, शिरपूर व के.व्ही.टी.आर.सी बी.एस.ई स्कूल शिरपूर यांच्यात झाला व या अटीतटीच्या सामन्यात क्रांतिवीर शंकर पांडु माळी माध्यमिक विद्यालय वरवाडे,शिरपूर या विद्यालयाने विजेतेपद पटकावले तर के.व्ही.टी.आर.सी बी.एस.ई स्कूल शिरपूरचा संघ उपविजेता ठरला.
या विजयाबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे यांनी अभिनंदन केले.यावेळेस संस्थेचे व्यवस्थापक ए.ए.पाटील, मुख्याध्यापिका कल्पना ईशी, विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.एम पाटील उपस्थित होते.या यशाबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डाॅ.तुषार रंधे,खजिनदार आशाताई रंधे,पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संगठनचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे,विश्वस्त रोहित रंधे,शामकांत पाटील,संजय गुजर,धुळे-नंदुरबार ग.स बँकेचे संचालक शशांक रंधे यांनी कौतुक केले.यासाठी किसन पावरा सर,हेमंत शिरसाठ सर,संजय मोते सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.