जळगाव येथील रुग्णाची डॉ. (राव) पाईल्स स्पेशालिस्टकडून आर्थिक फसवणूक; रुग्णाची न्यायाची मागणी
जळगाव, दि. ०८ सप्टेंबर २०२५: जळगाव येथील चित्रा चौक परिसरातील डॉ. (राव) पाईल्स स्पेशालिस्ट क्लिनिकमध्ये एका रुग्णाची आर्थिक आणि मानसिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाईल्सच्या त्रासामुळे या क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेलेल्या रुग्णाने डॉ. (राव) यांच्याकडून मिळालेल्या चुकीच्या सल्ल्यामुळे आणि आर्थिक नुकसानामुळे तीव्र संताप व्यक्त केला आहे.रुग्णाने सांगितले की, पाईल्सच्या त्रासासाठी ते डॉ. (राव) यांच्या क्लिनिकमध्ये गेले असता, डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. यासाठी त्यांच्याकडून ११,०००/- रुपये घेण्यात आले. मात्र, पैसे घेतल्यानंतर डॉ. (राव) हे आपल्या मूळ गावी हैदराबादला निघून गेले. रुग्णाला त्रास वाढत गेल्याने ते दररोज क्लिनिकच्या चकरा मारू लागले. तिथे डॉ. (राव) यांचा मुलगा डॉ. नरसिंहा वैद्यराज यांनी “उद्या येतील, परवा येतील” अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. सुमारे ८-१० दिवस अशीच परिस्थिती राहिल्याने रुग्ण कंटाळला आणि त्याने अखेरीस डॉ. पराग जहागिरदार यांच्याकडे शस्त्रक्रिया करून घेतली.रुग्णाने डॉ. नरसिंहा वैद्यराज यांना ११,०००/- रुपये परत मागितले असता, त्यांनी रुग्णाचा कॉल ब्लॅक लिस्टमध्ये टाकला. काही वेळा कॉल उचलून “उद्या देतो, परवा देतो” अशी उत्तरे देऊन टाळाटाळ केली. अखेरीस रुग्णाने फोन करणे बंद केले. या सगळ्या प्रकारामुळे रुग्णाचे आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले असून, सध्या ते बेडवर असून चालणे-फिरणेही कठीण झाले आहे.या रुग्णाने संबंधित यंत्रणांनी याची दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच, इतर रुग्णांसोबत अशा प्रकारची फसवणूक होऊ नये, यासाठी हा अनुभव उघड केला आहे. या प्रकरणी स्थानिक प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणा काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Note:- बातमी सोबत शहर police station, तसेच S.P office ची
O/C जोडलेली आहे 👇
