साहित्यिक कृष्णा पाटील यांच्या ‘कामगारांच्या कविता’ या कवितासंग्रहातील ‘चल नांदायला येडी’ या प्रभावी कवितेचा अभ्यासक्रमात समावेश.

अपनी भाषा में पढ़े! Translate

साहित्यिक कृष्णा पाटील यांच्या ‘कामगारांच्या कविता’ या कवितासंग्रहातील ‘चल नांदायला येडी’ या प्रभावी कवितेचा अभ्यासक्रमात समावेश.

 

अमळनेर : विक्की जाधव 

जेष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांच्या ‘कामगारांच्या कविता’ या कवितासंग्रहातील ‘चल नांदायला येडी’ या प्रभावी कवितेचा समावेश प्रथम वर्ष बी.ए. च्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. ही कवितेची निवड साहित्यविश्वातील ग्रामीण व कामगार जीवनाचे दर्शन घडवणाऱ्या सशक्त लेखनाला मिळालेली मोठी दाद मानली जात आहे.

प्रताप महाविद्यालयाच्या स्वायत्त अभ्यासक्रमासाठी ‘काव्यगंध’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तकात विविध कवी-लेखकांच्या निवडक साहित्याचा समावेश असून, बी.ए. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ते संदर्भित करण्यात आले आहे. मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रमेश माने यांनी विद्यार्थ्यांसाठी विविधांगी साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. कृष्णा पाटील यांच्या ‘कामगारांच्या कविता’ या संग्रहाला यापूर्वी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. आता त्यातील कवितेला विद्यापीठ अभ्यासक्रमात स्थान मिळाल्याने साहित्यिक क्षेत्रासह अमळनेरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, अहिराणी साहित्याला मिळालेली ही प्रतिष्ठा अभिमानास्पद ठरली आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!