ईद मिलाद निमित्त कसाली मोहल्ल्यात रक्तदान शिबिराचे आयोजन.

अपनी भाषा में पढ़े! Translate

 ईद मिलाद निमित्त कसाली मोहल्ल्यात रक्तदान शिबिराचे आयोजन.

 

अमळनेर : विक्की जाधव 

ईद मिलादच्या निमित्ताने कसाली मोहल्ला (रजा ग्रुप) तर्फे सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला समाजातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाला मा. आमदार शिरीषदादा चौधरी,  डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, तसेच नगरसेवक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील सर्व घटकांनी उत्साहाने सहभाग नोंदवून “रक्तदान हेच जीवनदान” या संदेशाचा जागर समाजात पोहचवला.

या उपक्रमात नगरसेवक फिरोज पठान, नगरसेवक सलीम टोपी, शहराध्यक्ष मुख्तार खाटिक, नगरसेवक शेखा हाजी, काँग्रेस शहराध्यक्ष मनोज पाटील, शिवसेना शहरप्रमुख आबा सो., तसेच सामाजिक कार्यकर्ते इम्रान खाटिक, गुलाम नबी पहलवान, आरिफ पठान, हाजी दबीर पठान, अमीर खा मिस्त्री, सैय्यद आसिफ अली, पत्रकार रिजवान मणियार यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिबिराला उपस्थित राहून कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!