दादांची दादागिरी! सत्तेचा माज शिखरी!!

अपनी भाषा में पढ़े! Translate

दादांची दादागिरी!
सत्तेचा माज शिखरी!!
करमाळ्याच्या उप अधिक्षक अंजली कृष्णा या IPS महिला अधिकाऱ्याला घोटाळेबाज अजित पवार यांनी फोन वरून धमकी दिली. सदर अधिकारी महिलेची चूक इतकीच की, त्यांनी बेकायदेशीरपणे मुरूम उत्खनन करून चोरी करण्याचे कृत्य रोखले. त्यांची चूक इतकीच की, हे बेकायदेशीर काम करणारे
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. त्यांचे बेकायदेशीर मुरूम उत्खनन रोखणे हा किती मोठा प्रमाद होता? एकीकडे तोंडवर करून म्हणायचे, आमचे राज्य कायदा व सुव्यवस्था राखणारे आहे, आणि कायदेभंग करून खनिजांची चोरी करणाऱ्या माफियांच्याच फोन वरून त्या कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यास “मी अजित पवार बोलतो, कारवाई थांबवा नाहीतर तुमच्यावर कारवाई करेन, अशी उघड धमकी देणे उप मुख्यमंत्री या ( असंवैधानिक ) पदावरील नेत्यास अशोभनीय आहे. अंजली कृष्ण या महिला अधिकाऱ्याच्या कायदेशीर सरकारी कारवाईत अडथळा आणण्याचा गुन्हा अजित पवार यांनी केला आहे. हाच प्रकार सर्वसामान्य नागरिकांनी केल्यास जशी कायद्याने 353 कलमाखाली कारवाई होते, तशी कारवाई अजित पवारांवर झाली पाहिजे. “मै डीप्टी चिफ मिनिस्टर अजित पवार बोल रहा हुं. आप तहसीलदार को बतादो की,अजित पवार का फोन आया था. त्यावर ती महिला अधिकारी विनम्रपणे बोलते, आप मेरे फोन पे कॉल किजीये. त्यावर अजित पवार सत्तेचा व पदाचा माज आल्यागत त्यांना धमकी देतात की “मी तुमच्यावर कारवाई करेन.”
आपल्या माफिया कार्यकर्त्याला संरक्षण देण्यासाठी अजित पवारांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा ( या प्रकरणी तोही त्यांना नाही ) गैरवापर करून आपल्या शपथेचाही भंग केला आहे. अशी दादागिरी जर सत्ताधारी करीत असतील तर राज्यात भ्रष्ट,चोर,दलालांचे व माफियांचे राज्य निरंकुशपणे नांदेल. अशी वृत्ती राज्याला अराजकतेकडे नेईल, अशी भीती वाटणे रास्त ठरेल.
दादा! तुमचे हे वागणे बरे नव्हे, दादांच्या या गैरवर्तणुकीचे लंगडे समर्थन करणारे, दादां इतकेच दोषी आहेत.
दिलीप मालवणकर
9822902470

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!