अमळनेर फार्मसी महाविद्यालयात गणेशोत्सव २०२५ भक्ती, उत्साह व एकतेच्या वातावरणात साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर फार्मसी महाविद्यालयात गणेशोत्सव २०२५ भक्ती, उत्साह व एकतेच्या वातावरणात साजरा

 

अमळनेर विक्की जाधव.

खान्देश शिक्षण मंडळ संचलित फार्मसी महाविद्यालयात गणेशोत्सव २०२५ मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. दि. २७ रोजी गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आल्यानंतर पाच दिवस महाविद्यालयात सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रमांची रेलचेल होती. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण महाविद्यालयात उत्सवाचे वातावरण भारावून गेले.

क्रीडा स्पर्धा, नृत्य, गायन, एकांकिका आणि पारंपरिक वेषभूषेच्या कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांनी आपले सुप्तगुण सादर करून वातावरण रंगवले. विशेष म्हणजे शिक्षकेतर कर्मचारी देखील या उत्सवात सहभागी झाले आणि त्यांच्या कलाविष्कारांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सर्वांनी एकत्र येऊन सात्विक भोजनाचा आस्वाद घेतला, तर आर्थिक नियोजन, भोजन व्यवस्था आणि कार्यक्रमांचे समन्वयन यामध्ये शिक्षक-विद्यार्थी व कर्मचारी वर्गाने एकजुटीचे दर्शन घडवले.

दि. ३१ रोजी सत्यनारायण महापूजनानंतर श्री. गणेश विसर्जन पार पडले. या प्रसंगी खा.शि. मंडळाचे कार्याध्यक्ष, संचालक व पदाधिकारी यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र सोनवणे, सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांचे कौतुक करून “गणेशोत्सवासारख्या उपक्रमांमुळे शैक्षणिक जीवनात भक्ती, सुसंस्कार आणि एकतेची जोपासना होते,” असे मत व्यक्त केले. गणेशोत्सव २०२५ हा उत्सव फार्मसी महाविद्यालयाच्या उत्साहपूर्ण व संस्कारी परंपरेचे प्रतीक ठरला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!