विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती जोपासण्यासाठी रोटरी क्लब अमळनेरचा अभिनव उपक्रम.

अपनी भाषा में पढ़े! Translate

विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती जोपासण्यासाठी रोटरी क्लब अमळनेरचा अभिनव उपक्रम.

 

अमळनेर : विक्की जाधव.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब अमळनेरने विद्यार्थ्यांसाठी ज्ञान आणि संस्काराचा अनोखा सेतू बांधला. “संकल्प – चांगला माणूस बनण्याचा” हे पुस्तक विद्यार्थ्यांना भेट देत वाचन संस्कृती रुजविण्याचा आणि चांगल्या सवयी विकसित करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामागे नवजीवन प्लस सुपर शॉपी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या पुस्तकात मानसिक आरोग्य, व्यायाम, संतुलित आहार, पर्यावरणपूरक जीवनशैलीपासून करिअर निवडीसारखे विद्यार्थी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त विषय समाविष्ट आहेत. पुस्तिकेवर आधारित प्रश्नावली देण्यात आली असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लबकडून आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. “चांगला माणूस होणे म्हणजे फक्त चांगल्या सवयी नव्हे तर चांगले विचार असणे होय,” असा प्रेरणादायी संदेशही विद्यार्थ्यांना देण्यात आला.

या उपक्रमात रोटरीची ‘चार प्रश्नांची चाचणी’ विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली ज्यामुळे सत्य, न्याय, स्नेह आणि सर्वांच्या हिताचा विचार करण्याची दिशा मिळाली. दौरा कन्या शाळा व साने गुरुजी विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षकांचा सहभाग तसेच रो. देवेंद्र कोठारी, रो. आशिष चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन रो. अभिजीत भांडारकर व रो. दिलीप भावसार यांच्या मार्गदर्शनामुळे हा प्रकल्प यशस्वी ठरला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!