गणेशोत्सवानिमित्ताने दौंड येथील डीवायएसपी हॉल येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान संपन्न.

अपनी भाषा में पढ़े! Translate

गणेशोत्सवानिमित्ताने दौंड येथील डीवायएसपी हॉल येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान संपन्न.

प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158

दौंड – संपुर्ण महाराष्ट्रात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे या निमित्ताने दौंड शहरात श्री गणेशा आरोग्याचा हे आरोग्य अभियान राबविण्यात आले, दौंड नगरपरिषद दौंड, उपजिल्हा रुग्णालय दौंड, नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र, दौंड पंचायत समिती आरोग्य विभाग दौंड , दौंड मेडिकल असोसिएशन व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आज डीवायएसपी हॉल दौंड या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबीर दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे व आरोग्यवर्धिनी केंद्राच्या डॉ.स्नेहा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले मा. जिल्हाधिकारी सो पुणे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये श्री गणेशा आरोग्याचा हा उपक्रम राबविण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार आज दौंड शहरात हा आरोग्य तपासणी शिबीर उपक्रम राबविण्यात आला. या शिबीरात तज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते जनरल तपासणी करता डॉ. शेख, स्री रोग तज्ञ डॉ.सोनवणे डॉ. स्नेहा सिदगणे ,डॉ. गौरी जगदाळे फिजिओथेरपी डॉ. केतकी जाधव ,लॅब टेक्निशियन डॉ. सोमनाथ सोनवणे आदी वैद्यकीय अधिकारी व परिचारिका उपस्थित होत्या डॉ. समीर कुलकर्णी दिली कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक नंदू पवार ,प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव रामेश्वर मंत्री, दौंड नगरपालिकेचे नगर अभियंता मल्लिकार्जुन बनसोडे आदी उपस्थित होते. शिबीरादरम्यान दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे, बादशहाभाई शेख यांनी उपस्थिती दाखवली या कार्यक्रमांमध्ये महिला बचत गटांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला दौंड शहरातील एकूण २१२ नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घेतला. उपस्थित पाहुण्यांचे व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्वागत आरोग्य विभाग प्रमुख शाहू पाटील यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा. प्रकल्प अधिकारी दीपक म्हस्के यांनी केले,तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासन विभागाचे विशाल ओहोळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दौंड नगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!