अमळनेर शहराच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय वाटचालीत बहुआयामी व्यक्तिमत्व प्रा. अशोक पवार सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध स्थरावरून शुभेच्छाचा वर्षाव..
अमळनेर शहराच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय वाटचालीत ज्यांनी आपला ठसा उमटवला आहे, अशी बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. अशोक पवार उर्फ बापूसाहेब. विचारांचा ठसा, रोखठोक भूमिका, प्रोत्साहन देण्याची वृत्ती, समाजहिताची तळमळ आणि कार्यातील सातत्य या त्यांच्या कार्यशैलीच्या जमेच्या बाजू आहेत.

प्राध्यापक अशोक पवार सर हे युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर या संस्थेचे अध्यक्ष म्हणून अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम यशस्वीरीत्या राबवत आहेत. संविधानाची सखोल जाण, माहिती अधिकारातील गाढा अभ्यास, वक्तृत्वकौशल्य आणि जनतेशी असलेली आपुलकी यामुळे ते समाजात एक वेगळे स्थान निर्माण करून आहेत. चळवळीतील त्यांचा प्रवास हा नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरतो.
त्यांच्या कार्यामुळे अमळनेरकरांचा त्यांच्यावर असलेला विश्वास अधिक दृढ झाला असून भविष्यात नगरपालिकेच्या नेतृत्वाची सूत्रे त्यांच्या हातात असतील, असा जनतेला पूर्ण विश्वास आहे. वैचारिक, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष नेतृत्वाची आज राजकारणाला गरज आहे आणि त्या निकषावर प्रा. अशोक पवार हे खरेच भावी नगराध्यक्ष म्हणून योग्य उमेदवार आहेत.
विशेष म्हणजे, प्रा. पवार यांनी अलीकडेच समाजमाध्यमांतून अमळनेर नगरपरिषद भावी नगराध्यक्ष पदासाठी आपली इच्छुकता व्यक्त करतील? आणि शहराच्या राजकारणात नवा उत्साह निर्माण होईल. त्यांना खऱ्या अर्थाने परिवर्तनाचे नेतृत्व मानू लागले आहेत. अशा या कर्तृत्ववान, प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या विविध स्थरावरून शुभेच्छाचा वर्षाव..
परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि समाजसेवेचे बळ देवो, हीच प्रार्थना.