प्रताप हायस्कूलचे किरण सनेर SET परीक्षेत यशस्वी
अमळनेर : विक्की जाधव.
येथील प्रताप हायस्कूलचे उपशिक्षक श्री. किरण प्रकाश सनेर यांनी प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या राज्य पात्रता परीक्षा (SET) जून २०२५ मध्ये यश मिळवले आहे. रसायनशास्त्र या विषयात ३०० पैकी १४७ गुण मिळवत त्यांनी पात्रता मिळवली असून त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सनेर यांचा पुढील शैक्षणिक प्रवास शिक्षण व संशोधन यामध्ये अधिकाधिक योगदान देण्याचा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी स्वतःला वाहून घेण्याची त्यांची तयारी असून, या दृढनिश्चयामुळे त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरत आहे.

त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सनेर यांचे अभिनंदन केले आहे. “ज्ञानाच्या मार्गावर मेहनत आणि चिकाटीने चालल्यास यश नक्की मिळते,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री. किरण सनेर यांची ही कामगिरी, असे मत शिक्षक-शिक्षणप्रेमींनी व्यक्त केले.