महाराष्ट्र भाजपा विस्तारित कोअर कमिटी सदस्यवर माजी मंत्री राम शिंदेची निवड
वहाडणे व फरांदे यांच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात पहिल्यांदाच मिळाले पद
प्रतिनीधी.संदिप कायगुडे
प्रतिनीधी.संदिप कायगुडे
कर्जत:काल मुंबई येथे भारतीय जनता पार्टी च्या झालेल्या मीटिंग मध्ये महाराष्ट्रातील आगामी सर्व निवडणुकांसाठी व युव्हरचना आखण्यासाठी राज्यस्तरीय विस्तारित कोअर कमिटी नेमण्यात आली.या कोअर कमिटी मध्ये कर्जत जामखेड चे माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष श्री.राम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल महाराष्ट्राच्या विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्रातील पक्षाचे भविष्यातील कार्य , नियोजन , दौरे ,यात्रा, प्रचार , प्रसार व आगामी सर्व निवडणुकीचे उमेदवार निवडणे यासाठी ही समिती कार्य करते .
अहमदनगर जिल्ह्यातील भाजपाचे दिवंगत नेते मा. सूर्यभान वहाडणे , व ना. स.फरांदे
यांच्या नंतर पहिल्यांदाच अहमदनगर जिल्ह्याला श्री.शिंदे यांच्या रूपाने या विस्तारित कोअर कमिटी वर सदस्य म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाल्याने भाजपा च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे .
पक्षाने दिलेल्या गोवा येथील विधानसभा निवडणुकीची ही जबाबदारी श्री.शिंदे यांनी अतिशय जबाबदारी व नेटाने पार पाडली असून त्यांच्या कार्यकौशल्याने नक्कीच त्यांना दिलेल्या मतदारसंघात निकालाच्या माध्यमातून त्यांच्या कामाचा ठसा उमटलेला दिसणार आहे.
“श्री.शिंदे साहेब यांच्यावर पक्षाने टाकलेल्या या जबाबदारी च्या पदाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुद्धा आपल्या कार्यकुशलतेने व समयसुचकतेने भाजपा चे कार्य चांगल्या पद्धतीने करून पक्ष वाढीचे प्रयत्न करतील आणि
आणि हे सर्व कार्य होण्यासाठी आई जगदंबा व सद्गुरू गोदड महाराज त्यांना उदंड व निरोगी आयुष्य देवो या मनपूर्वक शुभेच्छा व मनपूर्वक अभिनंदन…!!!