श्री मंगळग्रह देवाचा भव्य जन्मोत्सव : लाखो भाविकांनी घेतले दर्शन

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्री मंगळग्रह देवाचा भव्य जन्मोत्सव : लाखो भाविकांनी घेतले दर्शन.

 

अमळनेर : विक्की जाधव.

श्री मंगळग्रह देवाचा जन्मोत्सव यंदा अतिशय शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि भव्य दिव्य पद्धतीने पार पडला. २९ व ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या महाभोमयाग व नवकुंडी शांती यागानंतर २ सप्टेंबर रोजी पहाटे ४ ते ७ वाजेदरम्यान श्री मंगळग्रह देवाची उत्सव मूर्ती पाळण्यात ठेवून पारंपरिक जन्मोत्सव साजरा झाला. लाखो भाविकांनी दर्शन घेतले तरीही दिवसभरात चोरी, अपघात किंवा कोणताही गैरप्रकार घडला नाही, ही विशेष बाब ठरली.

या सोहळ्यात ५६ भोगार्पण, ध्वजारोहण, महाअभिषेक आणि महाआरती यांसह विविध धार्मिक विधींना भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. माजी नगराध्यक्षा, खासदार, केंद्रीय राज्य मंत्री, शासकीय अधिकारी, उद्योगपती, राजकीय- सामाजिक नेते आदी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवली. सायंकाळी पालखी सोहळ्यात भक्तीमय जल्लोष अनुभवता आला. मंगळग्रह सेवा संस्था, स्थानिक सेवेकरी, स्वयंसेवी संघटना व सुरक्षा यंत्रणांच्या उत्तम समन्वयामुळे उत्सव निर्विघ्न पार पडला. शिस्त, नियोजन आणि भक्तीभाव यांचा सुंदर संगम घडवणारा हा जन्मोत्सव भाविकांच्या मनात कायम स्मरणात राहील, असा सूर सर्वत्र उमटला.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!