प्रा.हर्षवर्धन जाधव यांची प्रताप महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रा.हर्षवर्धन जाधव यांची प्रताप महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती.

 

अमळनेर  : विक्की जाधव.

खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर या प्रतिष्ठित महाविद्यालयाचे नवीन शैक्षणिक नेतृत्व आता प्रा. डॉ. हर्षवर्धन जाधव यांच्या हातात सोपविण्यात आले आहे. दिनांक ३ सप्टेंबर २०२५ पासून त्यांची प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली असून, माजी प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांच्या सेवानिवृत्तीनंतर ही जबाबदारी जाधव यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

या निमित्ताने आयोजित स्वागत समारंभात खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सीए नीरज अग्रवाल, ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब हरीभिका वाणी, विनोदभैय्या राजधर पाटील, नामवंत सर्जन डॉ. अनिल शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेतील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व माजी प्राचार्य डॉ. अरुण बी. जैन यांनीही प्रा. जाधव यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रा. हर्षवर्धन जाधव यांनी शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ परिश्रम घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे व शैक्षणिक दृष्टीकोनामुळे प्रताप महाविद्यालयाला नवीन ऊर्जा आणि दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारी, तसेच समाजातील विविध मान्यवरांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि अभिनंदनाचा वर्षाव केला.

प्रताप महाविद्यालयाच्या नवनियुक्त प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. हर्षवर्धन जाधव यांच्या कार्यकाळात महाविद्यालय अधिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!