शिवछत्रपती तरुण मित्र मंडळाने दिला सामाजिक संदेश
प्रतिनिधी – विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड – दौंड शहरातील छ.शिवाजी नगर या ठिकाणच्या शिवछत्रपती तरुण मित्र मंडळाने यावर्षी गणेशोत्सव साजरा करताना समाजासमोर एक नवा संदेश देत मंडळाची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर दिली मंडळाचे चालु
वर्ष ४२ वे असून
अध्यक्ष : सौ छाया अमित पवार
उपाध्यक्ष : सौ रवीना प्रविण ढोके
कार्याध्यक्ष : कुणाल परदेशी तसेच अनेक जबाबदार्या मंडळाच्या इतर महिलांना दिल्या गेल्या.
या वर्षीचे ४२ वे वर्षात पदार्पण केले या वर्षी मंडळाने सुबक मूर्ती बसवली असून त्याच प्रमाणे या वर्षी मंडळाने महिलांना प्राधान्य दिले मंडळा कडून सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व महिलांसाठी अनेक उत्साही कार्यक्रम घेण्यात आले. त्याच बरोबर नवा सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.