भीका पावरा यांचे यश SET परीक्षा उत्तीर्ण – अमळनेरच्या अभिमानात भर.
अमळनेर : विक्की जाधव.
प्रताप महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी भीका पावरा यांनी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (SET-2025) अर्थशास्त्र विषयात यश मिळवले आहे. अथक परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर त्यांनी हे यश संपादन करून महाविद्यालय, विभाग व कुटुंबाचा सन्मान वाढवला आहे. महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे, समुपदेशन आणि विभागातील अभ्यासाचे वातावरण यांचा भीका पावरा यांच्या यशात मोठा वाटा आहे. त्यांच्या कामगिरीमुळे अर्थशास्त्र विभागासह संपूर्ण महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण जैन यांच्यासह प्राध्यापक व सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार असल्याचे गौरवोद्गार काढले.