श्री मंगळग्रह जन्मोत्सवात नवकुंडी शांतीयाग व कळसारोहण महामंडलेश्वर जनार्दन महाराजांच्या उपस्थितीत ८१ यजमानांचा सहभाग

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्री मंगळग्रह जन्मोत्सवात नवकुंडी शांतीयाग व कळसारोहण महामंडलेश्वर जनार्दन महाराजांच्या उपस्थितीत ८१ यजमानांचा सहभाग..

 

अमळनेर : विक्की जाधव 

श्री मंगळ जन्मोत्सव महामंगलप्रसंगी तीन दिवसीय महासोहळ्याला भक्तिमय प्रारंभ झाला आहे. या सोहळ्यातील मुख्य आकर्षण म्हणून ३१ ऑगस्ट रोजी मंदिर प्रांगणात नवकुंडी महाविशेष शांतीयाग दोन सत्रात पार पडणार असून देशभरातून आलेले ८१ यजमान सपत्नीक सहभागी होणार आहेत. तसेच माता भैरवी व श्री कालभैरव यांच्या त्रिशुलात्मक मंदिराच्या कळसारोहणाचा सोहळा फैजपूर येथील महामंडलेश्वर श्री जनार्दन महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

२७ वर्षांनंतर मंगळग्रह देवाच्या प्रभावाच्या वर्षात आलेल्या या जन्मोत्सवाला विशेष महत्त्व लाभले आहे. २९ ऑगस्ट रोजी श्री महाभोमयाग भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान दोन सत्रात प्रत्येकी ३६ यजमान अशा एकूण ७२ यजमानांच्या हस्ते नवकुंडी शांतीयाग पार पडेल. तर कळसारोहणाच्या व्दिकुंडीय महापूजेत नऊ यजमान सहभागी होतील.पूर्णाहुतीनंतर संध्याकाळी ६ वाजता महाआरती होऊन यागाची सांगता होईल. या धार्मिक उत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मंदिर प्रांगणात भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग आणि आध्यात्मिकतेचे वातावरण अनुभवायला मिळणार आहे. श्री मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे भाविकांना या दिव्य सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले असून संपूर्ण अमळनेरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!