अमळनेर तालुक्यातील मारवड मंडळात २९ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर तालुक्यातील मारवड मंडळात २९ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान..

 

अमळनेर : विक्की जाधव.

तालुक्यातील मारवड मंडळात २९ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे वासरे, कळमसरेसह अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले. वासरे गावात ८२ कुटुंबांच्या घरात पाणी शिरून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली असून अनेक घरे पडली आहेत. कळमसरे गावात १५ घरांची पडझड झाली तर २५ घरांमध्ये पाणी साचले. स्वस्त धान्य दुकानातील सुमारे ३० क्विंटल धान्य पाण्यात भिजल्याने खराब झाले. या आपत्तीमुळे गावांचा संपर्क तुटला तर हजारो हेक्टरवरील मका, कपाशी, उडीद आणि मूग पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी महसूल व ग्रामपंचायत यंत्रणा तातडीने कार्यरत झाली. वासरे येथील बाधित कुटुंबांना समाजमंदिर व उंच ठिकाणी हलवण्यात आले. ग्रामस्थ व सामाजिक संस्थांनी भोजनाची व्यवस्था केली. रोहिदास पाटील यांनी दिवसा भोजनाची तर लायन्स क्लब अमळनेरने रात्री भोजनाची सोय केली. ग्रामपंचायतीतर्फे गहू पीठ, साखर, तेल, मसाले आदी धान्याचा शिधा वाटप करण्यात आला. गावकऱ्यांनीही बाधित कुटुंबांना आपल्या घरी आसरा दिला.

प्रशासनाकडून संयुक्त पंचनामे सुरू असून तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, एसडीओ नितीनकुमार मुंडावरे यांनी गावांना भेट दिली. खासदार स्मिता वाघ यांनी ही घटनास्थळी भेट देऊन आपद्ग्रस्तांचे सांत्वन केले आणि तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिल्याने नुकसानाचे नेमके स्वरूप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

ग्रामीण भागासह अमळनेर शहरातही नुकसान झाले असून मिल चाळ परिसरात श्रीरंग सातपुते यांचे घर पावसाने पडल्याने कुटुंब उघड्यावर आले. या पार्श्वभूमीवर शेतकरी व नागरिकांकडून सरसकट पंचनाम्याची मागणी होत आहे. शासनाने व लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष देऊन मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!