गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलीस उपविभागाने “हैं तैयार हम” मॉकड्रिल व रूट मार्च आयोजित केला.

अपनी भाषा में पढ़े! Translate

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलीस उपविभागाने “हैं तैयार हम” मॉकड्रिल व रूट मार्च आयोजित केला.

 

अमळनेर : विक्की जाधव 

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या दोनही प्रमुख सणांच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलीस उपविभागाने “हैं तैयार हम” या संदेशासह शहरात मॉकड्रिल व रूट मार्च आयोजित केला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या या सरावाला मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी ९.४५ ते ११.४५ या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधलीपुरा परिसरात ढाल, लाठी, गॅसगन, शिल्ड व ग्रेनेडसह दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

या सरावात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक कोते, पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम तसेच जळगाव येथील कवायत निर्देशकांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व अंमलदारांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर शहरातील संवेदनशील भाग – आंबेडकर चौक, सुभाष चौक, बाजारपेठ, जामा मशीद, दगडी दरवाजा, सराफ बाजार आदी ठिकाणी पोलीस दलाने रूट मार्च काढला. त्यामुळे शहरभर शिस्तबद्धता व सुरक्षिततेचा संदेश पोहोचला. या मोहिमेत अमळनेर, मारवड, पारोळा व एरंडोल पोलीस स्टेशनचे अधिकारी-अंमलदार, दंगा नियंत्रण पथक, स्ट्रायकिंग फोर्स आणि ६२ होमगार्ड सहभागी झाले होते. नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत करून पोलिसांना सहकार्य केले. त्यामुळे अमळनेर शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृढतेसह एकात्मतेचा भाव अधिकच बळकट झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!