लायन्स क्लब अमळनेर व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने  HPV लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त..

अपनी भाषा में पढ़े! Translate

लायन्स क्लब अमळनेर व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने  HPV लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त..

 

अमळनेर : विक्की जाधव 

लायन्स क्लब ऑफ अमळनेर व मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नर्मदा मेडिकल फाउंडेशन हॉस्पिटल येथे आयोजित केलेल्या HPV लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्घाटन प्रसंगी श्री. प्रकाशभाऊ मुंदडा यांनी समाजाच्या आरोग्यासाठी आयोजकांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करत हे पाऊल खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरेल असे मत व्यक्त केले.

या शिबिरात तब्बल १,२५० मुलींना HPV लस देण्यात आली. गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रतिबंधासाठी हे उपक्रम ठोस पाऊल असल्याचे मान्यवरांनी सांगितले. डी.आर. कन्या शाळा, साने गुरुजी हायस्कूल, लोकमान्य टिळक हायस्कूल, सरस्वती विद्या मंदिर, भगिनी मंडळ स्कूलसह अनेक शाळांतील विद्यार्थिनींनी या लसीकरणाचा लाभ घेतला. लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. संदीप जोशी, सचिव महेंद्र पाटील, खजिनदार नितीन विंचुरकर, प्रकल्प अध्यक्ष डॉ. मिलिंद नवसरीकर यांच्यासह संपूर्ण टीमने नियोजनबद्ध पद्धतीने काम करून शिबिर यशस्वी केले. शिबिरात मान्यवरांसह लायन्स क्लबचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कॅन्सर पेशन्ट एड असोसिएशनच्या डॉ. नुपूर खरे यांचे मोलाचे सहकार्य तसेच नर्मदा मेडिकल फाउंडेशनच्या स्टाफचा अथक परिश्रम या यशामागे होता. मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या दातृत्वामुळे उपक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त झाले. या लसीकरण शिबिराची नोंद अमळनेरच्या आरोग्य इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून केली जाईल.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!