ऋषीपंचमीच्या निमित्ताने श्री कपिलेश्वर महादेव मंदिरास असंख्य  भाविकांचीं भेट 

अपनी भाषा में पढ़े! Translate

ऋषीपंचमीच्या निमित्ताने श्री कपिलेश्वर महादेव मंदिरास असंख्य  भाविकांचीं भेट 

 

अमळनेर : विक्की जाधव

ऋषीपंचमीच्या पावन निमित्ताने अमळनेर तालुक्यातील ऐतिहासिक व प्रसिद्ध श्री कपिलेश्वर महादेव मंदिर भाविकांनी गजबजून गेले. हजारो महिला भाविकांनी सकाळी लवकरपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्याने मंदिर परिसर यात्रास्थळाचे स्वरूप धारण करत होता. जळगाव, धुळे, नंदुरबारसह संपूर्ण खानदेशातून आलेल्या महिला भाविकांनी पूजा-अभिषेक, व्रतपरायणता व दर्शन याचा लाभ घेतला.

 

ऋषीमुनींच्या ऋणाची जाणीव ठेवत हा दिवस कृतज्ञतेने साजरा केला जातो. स्त्रियांकडून या दिवशी उपवास, व्रत व स्नान यांसह विविध धार्मिक विधी पार पाडले जातात. या पार्श्वभूमीवर तापी, पांजरा आणि गुप्तगंगा या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेल्या कपिलेश्वर महादेव मंदिरात भक्तीभावाची लाट उसळली होती. मंदिराच्या गाभाऱ्यात सुगंधी फुलांनी सजावट करण्यात आली होती, तर देवालय परिसर मंत्रोच्चार व आरत्यांनी दुमदुमून गेला होता. वातावरणात भक्तिभाव, उत्साह आणि अध्यात्म यांचे अनोखे मिश्रण दिसून येत होते.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!