ऋषीपंचमीनिमित्त मंगळ ग्रह मंदिरात महिला भाविकांची अलोट गर्दी
अमळनेर : विक्की जाधव.
ऋषीपंचमीच्ो धार्मिक महत्त्व लक्षात घेता खानदेशातील हजारो महिला भाविकांनी येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात दर्शन घेतले. त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते.

ऋषीमुनींचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ऋषीपंचमी होय. शिवाय ऋषींबद्दल आपल्या मनात आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही या दिवसाचे महत्त्व आहें. त्यामुळे शास्त्रानुसार यादिवशी व्रतही केले जातात. हे धार्मिक महत्त्व लक्षात घेता अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात पहाटे ६ वाजेपासून जळगाव, धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यातील महिला भाविकांनी दर्शन, पूजा, अभिषेकसाठी गर्दी केली होती. यानिमित्त मंदिरातील गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावटदेखील करण्यात आली होती. त्यामुळे मंदिर परिसरात भक्तीमय व चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.
