अमळनेर नगरपरिषदेच्या टी.पी. नंबर-123 मधील गाळ्यांचा लिलाव संशयास्पद

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर नगरपरिषदेच्या टी.पी. नंबर-123 मधील गाळ्यांचा लिलाव संशयास्पद

 

 

अमळनेर :  विक्की जाधव.

भाग – 1

टी.पी. नंबर-123 मधील A व B विंग मध्ये नगरपरिषद अमळनेरने ऑनलाईन लिलावाद्वारे व्यवसायिक गाळ्यांची विक्री केली. मात्र नगरपरिषद “ब” कॅटेगिरीची असताना गाळ्यांचे गगनचुंबी दर लावल्याने गोरगरीब व छोट्या व्यापाऱ्यांच्या हातून गाळे सुटले. या कथित गैरव्यवहाराचा मुद्दा आता थेट उच्च न्यायालयात पोहोचला आहे.

अनंत निकम, संजय युराज पाटील, शीतल पाटील व सुभाष जगदेव यांनी दाखल केलेल्या याचिकेत गाळ्यांच्या अवाजवी किंमतीसह ई-लिलावातील अनियमितता, मंजूर प्लॅन नुसार दुकाने नसणे, दोन रोड कॉर्नर दुकाने बेकायदेशीरपणे विकणे या गंभीर बाबी उघड केल्या आहेत. याचिकेतील मुद्दे झाकण्यासाठी ठेकेदाराने जाणूनबुजून FSI मध्ये हेराफेरी करून तोडफोड सुरू केली असल्याचा आरोप अनंत निकम यांनी केला आहे.

निकम म्हणाले की, “प्रत्येक विक्री झालेले गाळे हे मंजूर प्लॅन व FSI नियमबाह्य आहेत. जोपर्यंत उच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत व्यापाऱ्यांनी पैसे भरणे योग्य नाही.” बांधकाम दरम्यान अधिकाऱ्यांनी साईट व्हिजिट करताना झोप घेतली होती का? ठेकेदाराने आर्थिक देवाण-घेवाण करून अनियमितता मंजूर करून घेतली का? अशा प्रश्नांनी शहरात चर्चेला जोर धरला आहे.

नगरपरिषद, मुख्याधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताचा हा प्रकार असल्याचा आरोप होत असून, अमळनेरात गाळ्यांच्या लिलाव प्रकरणावर आता संतप्त चर्चा पेटल्या आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!