देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अपनी भाषा में पढ़े! Translate

देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 

अमळनेर : विक्की जाधव

के. ई. एस. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, अमळनेर तर्फे देशप्रेमाची भावना दृढ करण्यासाठी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणाने संपूर्ण वातावरण राष्ट्रप्रेमाने भारावून गेले.

कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती पूजनाने झाले. प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन अध्यक्षस्थानी होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरतात,” असे प्रतिपादन केले. विचारमंचावर के. ई. एस. संस्थेचे सचिव प्रा. पराग पाटील व इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. वर्षा पाठक उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण आणि राष्ट्रभावना वृद्धिंगत करण्यावर भर दिला.एकूण ५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला, तर प्रताप महाविद्यालयातील बी.सी.ए. व बी.एस.सी.चे २५० विद्यार्थी प्रेक्षक म्हणून उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. धनंजय चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बी.सी.ए. आणि बी.एस.सी. कॉम्प्युटर विभागातील प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन बी.सी.ए.च्या कु. नम्रता पाटीलने केले. समारोपाला प्रा. धनंजय चौधरी यांनी त्यांच्या खड्या आवाजात “महाराष्ट्र गीत” सादर करून कार्यक्रम अविस्मरणीय केला.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!