सुरंगली येथे बैल पोळा उत्साहात विना पोलिस बंदोबस्त शांततेत साजरा ।

अपनी भाषा में पढ़े! Translate

सुरंगली येथे बैल पोळा उत्साहात विना पोलिस बंदोबस्त शांततेत साजरा ।
भोकरदन तालुका प्रतिनिधी संजीव पाटील। भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथे श्री क्षेत्र काशी विश्वेश्वर मंदिर प्रांगणात शेतकऱ्यांचा महत्वाचा बैल पोळा हा सण उत्साहात विना पोलिस बंदोबस्त साजरा करण्यात आला. या परीसरात नुकताच चांगला पाऊस पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी हा सण आनंदात साजरा केला. बैलांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. शेतीच्या कामासाठी यांत्रिक पद्धतीने ट्रॅक्टरचा वापर होत आहे. सालगडी मिळत नसल्याने आणि बैल जोडी सांभाळणे खर्चिक झाले आहे . त्यामुळे दिवसेंदिवस बैलांची संख्या घटत आहे.या वेळी पोलिस पाटील संजय तुकाराम दांडगे हे उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!