करमाळा प्रतिनिधी:- बैल पोळा सणानिमित्त गुरु गणेश दिव्यरत्न गो -पालन संस्था येथे बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ह्या वेळेस सगळ्या गो -मातेला पुरण पोळी चा नैवेद्य खाऊ घालून मान्यवऱ्यांच्या हस्ते गो -मातेची पूजा करण्यात आली. ह्या वेळेस डॉ. महेश नगरे यांनी गो शाळेच्या कार्याचे कौतुक करून गो -मातेचे महत्व पटवून दिले. त्या नंतर संघा चे प्रचारक यांनी आपले विचार व्यक्त केले. संस्थे चे अध्यक्ष श्रेणिक खाटेर यांनी उपस्थित सर्वांचे संस्थेच्या वतीने स्वागत केले. तसेच गो -शाळा सुरु झाल्यापासून आज पर्यंत चा सर्व वृत्तांत सांगितला. संस्थेचे सदस्य जगदीश जी शिगची यांनी स्व .गो वर्धनजी शिगची सर ,स्व .कांतिभाई संचेती .,श्रेणिक खाटेर यांचे सह मित्र परिवारात चर्चा होऊन ह्या गो शाळेची निर्मिती कशी झाली याची माहिती दिली. ह.भ. प. अमोल महाराज कालदाते यांनी आपल्या वाणी ने सगळ्यांना मंत्र मुग्ध केले. या गो -शाळेत गो -मातेची सेवा पोपट राव कालदाते परिवार गो शाळा स्थापन झाल्यापासून करत आहेत. या गो शाळेत 90 गो मातेची सेवा सुचारु पद्धतीने चालू आहे. या कार्यक्रमात सर्वांच्या उपस्थितीत गो मातेच्या सानिध्यात सौं .ज्योती ताई मुथा यांचा बेस्ट अबॅकस टीचर अवॉर्ड इन हिंदुस्थान बुक ऑफ रेकॉर्ड हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गो -पालन संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष श्रेणिकशेठ खाटेर व सर्व सदस्य सर्वांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला.
या वेळेस विशेष उपस्थिती API शीतल म्हस्के या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या .त्यांनी गो पालन संस्थेचे कौतुक केले .
या कार्यक्रमाला मा.नगराध्यक्ष आमोद शेठ संचेती ,डॉ .परदेशीं ,डॉ .नगरे, नरारे सर ,पत्रकार दिनेश मडके ,पत्रकार सिद्धार्थ वाघमारे ,पत्रकार ठाकुर ,पशु वैद्यकीय अधिकारी डॉ .धुमाळ ,संतोष शेठ गुगळे ,चंद्रकांत कटारिया ,रमेश कटारिया ,रमण कटारिया ,अमृत कटारिया ,डॉ .गादिया, विकास कटारिया ,चेतन किंगर ,नारायण पवार ,विजय मंडलेचा ,रसिक मुथा ,प्रकाश मुनोत , संतोष कटारिया ,अनिल सोळंकी ,रितेश कटारिया ,विक्रांत मंडलेचा ,मनोज पितळे ,शंकर रासकर, राजेंद्र कटारिया ,कचरू काका मंडलेचा ,अजिंक्य गुगळे ,आदेश ललवणी ,अजिंक्य महाजन ,चिवटे, दिनेश मुथा ,अक्षय मंडलेचा ,अभय शिंगवी ,गणेश बोरा ,संजय लुनिया ,चरण परदेशीं ,नितीन दोशी, प्रीतम दोशी ,अभिनव देवी ,लक्ष्मीकांत ठोंबरे ,वैभव दोशी ,आशिष बोरा ,संगीता खाटेर,मोक्षा खाटेर, ख़ुशी खाटेर ,ज्योती मुथा ,विना देवी ,उषा देवी ,हेमलता रासकर ,चंद्रकांत कालदाते, अमोल कालदाते ,विजय बरीदे ,गिरीश शहा ,अक्षय शिंदे ,भावेश देवी ,योगेश गिरीमकर ,नागेश पवार ,ननवरे ,यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते .