दिव्यांगाकरिता आनंदाची बातमी दिव्यांगाचे सर्टिफिकेट, युडी आयडी कार्ड आता पूर्वीप्रमाणे दौंड उपजिल्हा रुग्णालयामध्ये मिळणार.- प्रहार संघटने च्या पाठपुराव्याला यश.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – पुणे जिल्ह्यातील
दौंड तालुका व शिरूर तालुक्यातील दिव्यांगाकरिता आनंदाची बातमी दौंड उपजिल्हा रुग्णालयातील दिव्यांगांचे सर्टिफिकेट व चेकअप कॅम्प मध्यंतरी बंद करण्यात आले होते अनेकांच्या तक्रारी प्रहार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्याकडे केल्याने त्याची त्यांनी दखल घेऊन आरोग्य अधिकारी यांना समक्ष भेटून आंदोलनाचा इशारा दिला होता.
आरोग्य मंत्री यांना पत्र पाठवून कॅम्प तातडीने चालू करण्याविषयी निवेदन दिले होते त्याची दखल घेऊन दौंड उपजिल्हा रुग्णालयातील बारामती वरून आरोग्य अधिकारी डॉ.वानखेडे ,डॉ. गुजर डॉ. जाधव सर यांनी काल शुक्रवारी कॅम्पचे उद्घाटन करून दिव्यांगाचे सर्टिफिकेट, युडी आयडी कार्ड चालू झाल्याची घोषणा केली.
दौंड तालुका प्रहार अपंग क्रांती आंदोलन पश्चिम महाराष्ट्र सचिव रामेश्वर मंत्री व दौंड तालुक्यातील अपंग उपस्थित राहून सर्व आरोग्य अधिकारी यांचा सत्कार करून काम चालू केल्याचे जाहीर केले यामुळे दौंड तालुका शिरूर तालुका दिव्यांगाना होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी नेहमीप्रमाणे आरोग्य अधिकारी येऊन दिव्यांगांना अस्थिव्यंगाचे व अंधत्व डोळ्याचे सर्टिफिकेट दौंडमध्ये उपजिल्हा रुग्णालय मध्ये मिळेल याचा लाभ सर्व दौंड तालुका शहर व शिरूर तालुका नेहमीप्रमाणे कामकाज चालू झाले आहे सातव यांनी आरोग्य अधिकारी यांना भेटून उपजिल्हा रुग्णालयातील या सुविधा आपण चालू न केल्यास आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला होता याची दखल घेऊन आरोग्य अधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयांना पुन्हा या सुविधा चालू करण्याचे आदेश दिले त्याचा पहिला कॅम्प दौंड मध्ये काल शुक्रवारी पार पडला. या आंदोलनामध्ये सुरेखाताई ढवळे ,सुप्रियाताई लोखंडे, अनिताने ताई कदम ,रामेश्वर मंत्री यांच्या प्रयत्नामुळे झाले. यावेळी आरोग्य अधिकारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.