करमाळा प्रतिनिधी- करमाळा शहरातील सावंत गल्ली येथील छत्रपती शिवाजी तरुण मंडळ हे शहरातील आदर्श मंडळ म्हणून नावलौकिक मिळविलेले मंडळ आहे. मागील वर्षी या मंडळाने जिल्हाचे व तालुक्याचे आदर्श मंडळ, उत्कृष्ट मिरवणुक म्हणून पारितोषिक पटकावले होते
गणेशोत्सव २०२५ ची पदाधिकाऱ्याची निवड सुनील बापू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून या मध्ये मंडळाच्या अध्यक्षपदी साहील रोडे तर उपाध्यक्षपदी अक्षय बनकर व शाबीर शेख यांची निवड करण्यात आली आहे तसेच कार्याध्यक्षपदी आदित्य देशमाने ,मिरवणूक प्रमुखपदी अल्लाउद्दीन शेख , उप मिरवणूकपदी, महेश अंधारे तसेच लखन उबाळे ,सचिव पदी ओमकार सावंत तर सहसचिव रविंद्र सुरवसे तर खजिनदार म्हणून योगेश काकडे सल्लागार सुजित शेळके संघटक म्हणून बंटी शिंदे यांची निवड करण्यात आली.
यावेळी निवडीच्या वेळी सुनील बापू सावंत म्हणाले की ,या मंडळाची स्थापना सन १९४७ साली कै, अनंतराव आबा सावंत यांनी केली असून पुढे हमाल पंचायत चे संस्थापक सुभाष अण्णा सावंत यांनी ही परंपरा चालवली आमच्या मंडळात सर्व हिंदू मुस्लिम समाजातील युवकांना गणेश उत्सव मंडळात पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी दिली जाते प्रत्येक सण मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येतो तर आमच्या मंडळाची मिरवणूक ही विना पोलिस बंदोबस्तात शांततेत पार पडते ही मंडळाची वर्षानुवर्षे ची परंपरा असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले .शेवटी आभार बापू उबाळे यांनी मानले.