अमळनेर नगरपरिषद प्रभाग रचना नियमबाह्य; शिरीष दादा चौधरी मित्र परिवार आघाडीची ही हरकत
अमळनेर : विक्की जाधव.
नगरपरिषदेत नुकतीच जाहीर झालेली प्रभाग रचना वादग्रस्त ठरत असून, शिरीष दादा चौधरी मित्र परिवार आघाडीने या रचनेविरोधात तीव्र हरकत नोंदवली आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने केलेली प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाच्या नियम व अटींच्या पूर्णपणे विरोधात असल्याचा ठपका आघाडीने ठेवला आहे.
आघाडीच्या मते, प्रभाग रचनेत भौगोलिक सीमा, नद्या-नाले, रेल्वे रुळ यांचा विचार न करता नियम मोडले गेले आहेत. वस्त्यांचे ठरवून विभाजन करण्यात आले असून प्रगणक गटांचे हेतुपुरस्कर विभाजन करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ही रचना राजकीय हेतूने केली असून ती पूर्णपणे नियमबाह्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

या संदर्भात प्रभाग रचना तात्काळ रद्द करून महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार नव्याने रचना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर गटनेते प्रविण पाठक, रणजीत भिमसिंग पाटील, चंद्रकांत कंखरे सर, भरत पवार, नसिरोद्दीन हाजी शरफोद्दीन, जाकीर मेवाती, गुलाबनबी पठाण, भूषण पाटील, सागर विसपुते, राहुल कंजर, विपुल पाटील, सनी चव्हाण, शुभम यादव, मनोज शिंगाने, पंकज चौधरी, अनिल महाजन, नरेश कांबळे, नईम पठाण आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी स्वाक्षऱ्या करून उपस्थिती दर्शवली.