श्रावण सोमवार निमित्त योगीराज शिंपी तर्फे स्नेही मिलन तथा स्नेही सुरुची भोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्रावण सोमवार निमित्त योगीराज शिंपी तर्फे स्नेही मिलन तथा स्नेही सुरुची भोजन

शिरपुर : श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि सात्विकतेचा सण या पवित्र चौथा सोमवारी श्री. सारंगेश्वर महादेव मंदिर आमोदा ता. शिरपूर जि. धुळे येथे धुळे भारतीय जनता पार्टी सदस्य, बारा बलुतेदार महासंघ प्रदेश सदस्य तथा शिरपुर तालुकाध्यक्ष योगीराज बोरसे (शिंपी) यांचा तर्फे स्नेही मिलन तथा स्नेही सुरुची भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी धुळे भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, शिरपुर नपा माजी नगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, बाराबलुतेदार महासंघ उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्ष एकनाथराव बोरसे, धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपुर भाजपा मा. तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल, श्री. शनी मंदीर अध्यक्ष तथा तालुक्यातील प्रसिद्ध व्यापारी एन. डी. पाटील, आमोदा श्री. सारंगेश्वर महादेव मंदिर अध्यक्ष जगदिश देशमुख, पत्रकार प्रताप सरदार, शहरातील प्रसिद्ध व्यापारी श्रीनिवासशेठ राठी यांच्या उपस्थित दिनांक १८ सोमवार रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे भारतीय जनता पार्टी सदस्य, बारा बलुतेदार महासंघ प्रदेश सदस्य तथा शिरपुर तालुकाध्यक्ष योगीराज बोरसे (शिंपी) यांनी व्यासपिठावरील सह सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार केला. स्नेही मिलन तथा स्नेही सुरुची भोजन हे म्हणजे केवळ अन्नदान नाही, तर भक्तीभावाने आणि समर्पणाने केलेली खरी सेवा आहे. पवित्र चौथा सोमवारी श्री. सारंगेश्वर महादेव मंदिर आमोदा येथे पावसाळ्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. भक्तीचा व आध्यात्मिकतेचा दिव्य संगम साधला गेला. धुळे भारतीय जनता पार्टी सदस्य, बारा बलुतेदार महासंघ प्रदेश सदस्य तथा शिरपुर तालुकाध्यक्ष श्री. योगीराज बोरसे (शिंपी) यांचा स्नेही मिलन म्हणजे श्रद्धा आणि समाजसेवेच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा टप्पा आहे असे धुळे भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी यावेळी सांगितले. “अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान” याच भावनेतून श्रावण सोमवारचा हा उपक्रम मित्रांच्या हृदयात आनंद आणि समाधान निर्माण करणारा ठरला. यावेळी स्नेही प्रकाश गुरव, संजय आसापुरे, संजय चौधरी, रविंद्र भोई, राधेश्याम भोई, राजेश शिवदे, रमेश चौधरी, सुभाष लोहार, कुणाल माळी, नरेश चौधरी, प्रा. सदाशिव ठाकरे, अविनाश शिंपी, अनिल बोरसे, रविंद्र सोनार, मनोज भावसार, संजय पाटील, भुपेश बारी, जितेंद्र राजपुत आदि मित्रपरिवार उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!