एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांसाठी रोटरी क्लब, अमळनेरचा मदतीचा हात

अपनी भाषा में पढ़े! Translate

एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांसाठी रोटरी क्लब, अमळनेरचा मदतीचा हात..

 

अमळनेर : विक्की जाधव.

समाजातील उपेक्षा व संघर्ष झेलणाऱ्या एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांसाठी रोटरी क्लब, अमळनेर व आधार बहुउद्देशीय संस्था सातत्याने कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर १९ ऑगस्ट रोजी रोटरी हॉल येथे प्रोटीन टिन वाटपाचा कार्यक्रम पार पडला. रो. विनोद भैय्या पाटील यांच्या परिवाराच्या पुढाकारातून झालेल्या या उपक्रमामुळे मुलांना केवळ आहारच नव्हे तर आत्मविश्वास आणि समाजाकडून स्वीकृतीचा धीर मिळाला.

या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. देवेंद्र कोठारी, सचिव रो. आशिष चौधरी तसेच विवेक देशमुख, पूनम कोचर, प्रतीक जैन, किशोर लुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते. आधार संस्थेच्या डॉ. भारती पाटील, रेणु प्रसाद व कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले. मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा या उपक्रमाचा खरा यश ठरला.

रोटरी क्लब व आधार संस्थेच्या या संयुक्त प्रयत्नांमुळे समाजातील सर्व घटकांनी अशा मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची गरज अधोरेखित झाली. रोटरी क्लब, अमळनेर सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांत नेहमीच अग्रणी राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!