धावत्या रेल्वे गाडीत गुंगीचे औषधं देऊन लूटमार करण्याचा प्रयत्न : रेल्वे पोलिसांची कार्यवाही..

अपनी भाषा में पढ़े! Translate

धावत्या रेल्वे गाडीत गुंगीचे औषधं देऊन लूटमार करण्याचा प्रयत्न : रेल्वे पोलिसांची कार्यवाही..

 

 

अमळनेर : विक्की जाधव 

रेल्वेत प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लूटमार करणारा पंजाबचा सराईत गुन्हेगार अखेर अमळनेरच्या रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) जाळ्यात अडकला. बुधवारी पहाटे अहमदाबाद–हावडा एक्स्प्रेसमध्ये नवापूरजवळ घडलेल्या या थरारक घटनेत तिघे प्रवासी बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांच्या सतर्क सहप्रवाशाने दिलेल्या माहितीवरून आरपीएफ अधिकारी कुलभूषणसिंग चौहान यांनी तत्पर कारवाई करत आरोपीला जेरबंद केले.

घटनेनंतर वरिष्ठ निरीक्षक सत्यजित कुमार, बसंतराय व उदना येथील निरीक्षक दौलतसिंग शिसोदिया यांच्या समन्वयातून पोलिसांनी उदना स्टेशनवर तगडा बंदोबस्त लावला. भुसावळ–सुरत मेमु गाडीत तीन बॅगा घेऊन प्रवास करणारा संशयित पंजाबी तरुण दिसताच पोलिसांनी झडप घातली. चौकशीत त्याने आपले नाव निशांतसिंग (रा. गुरुदासपूर, पंजाब) असे सांगितले. त्याच्याकडून  रोख रक्कम, पाच मोबाईल, गुंगीचे औषध व अन्य साहित्य जप्त करण्यात आले.

दरम्यान सकाळी ९.२० वाजता अहमदाबाद–हावडा एक्स्प्रेस अमळनेरला पोहोचताच आरपीएफचे हेडकॉन्स्टेबल सुनीलकुमार, राकेशकुमार व राजुराम यांनी तिन्ही बेशुद्ध प्रवाशांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील तपासणीसाठी धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!