शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सुरज तानाजी मोरे बिनविरोध
बारामती ( सह संपादक- संदिप आढाव)
बारामती तालुक्यातील अंजनगाव येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुरज तानाजी मोरे व उपाध्यक्षपदी शरद विनायक वायसे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याने पालक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.
अंजनगाव येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शकुल मोरे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन अध्यक्षांची निवड करण्यासाठी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सदर बैठकीत मुख्याध्यापक पिसाळ सर यांनी सुरज तानाजी मोरे यांची अध्यक्ष व शरद विनायक वायसे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा केली.
दरम्यान शाळेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुरज मोरे यांनी सांगितले…