करमाळा प्रतिनिधी:- स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत शहरामध्ये घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्यासाठी घंटागाड्या सुरू आहे. सदर गाडीवर हिंदी ऐवजी मराठीत गीत हवे होते म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुकाध्यक्ष मा.संजय (बापु) घोलप यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती त्यानुसार घोलप यांच्या मागणीला यश आले असून शहरातील कचरा घंटागाडीवर मराठीत गाणी वाजत आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असल्याने समस्त महाराष्ट्रातील मराठी नागरिकांसाठी अभिमानाची बाब असल्याचे घोलप यांनी म्हटले आहे. तसेच सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मनसे च्या निवेदनाची दखल घेऊन यश आले असल्याचे मत घोलप यांनी व्यक्त केले त्यामुळे शहरातील मराठी माणसांचे व मनसे पदाधिकाऱ्यांसह मनसैनिक यांच्यात आनंदाचे वातावरण आहे .
यावेळी नानासाहेब मोरे जि.उपाध्यक्ष,अशोक गोफणे तालुकाउपाध्यक्ष, राजाभाऊ बागल तालुकाउपाध्यक्ष, सतिश फंड शहराध्यक्ष, सचिन कणसे शहरउपाध्यक्ष, मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष श्रीकांत चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या भावना गांधी, मनसे महिला शहराध्यक्ष संगीता नवनाथ क्षीरसागर, योगेश काळे, नवनाथ क्षीरसागर, उमेश सुरवसे, रोहित फुटाणे, नागेश दुधाट उपस्थित होते.