प्रवीण पाठक मनमिळाऊ नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रवीण पाठक मनमिळाऊ नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

 

अमळनेर : विक्की जाधव 

माननीय प्रवीण भाऊ पाठक (बबली पाठक) यांचा वाढदिवस हा अमळनेरच्या जनतेसाठी आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. आमदार शिरीष दादा चौधरी मित्र परिवाराचे मार्गदर्शक, नगरपरिषदेचे गटनेते म्हणून त्यांनी सतत जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठविला आहे. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव, कार्यकर्त्यांना दिलेला मायेचा आधार आणि सर्वांसोबत ठेवलेले आपुलकीचे नाते यामुळे ते खऱ्या अर्थाने “जनतेचे लोकनेते” म्हणून ओळखले जातात.

बबली भाऊ पाठक यांनी नगरपरिषदेच्या पातळीवर अनेक विकासकामे पुढे रेटली. नागरिकांच्या सोयीसुविधा, रस्ते, पाणी, स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवर ते नेहमी सक्रिय राहिले. मित्र परिवाराशी असलेले घट्ट नाते आणि सर्वसामान्यांमध्ये असलेली त्यांची लोकप्रियता यामुळे ते अमळनेरच्या राजकारणात “मुलुख मैदान तोफ” ठरले आहेत. त्यांची राजकारणाकडे पाहण्याची दृष्टी केवळ पद-प्रतिष्ठेसाठी नसून समाजातील सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी आहे. गावातील एखादा छोटा प्रश्न असो की शहराच्या विकासाचा मोठा आराखडा – बबली भाऊ नेहमी पुढाकार घेऊन कार्यकर्त्यांना सोबत घेतात. त्यांच्या नेतृत्वशैलीत ‘मी’ पेक्षा ‘आपण’ या विचारसरणीचे दर्शन घडते.

अशा या थोर नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त आमदार शिरीष दादा चौधरी मित्र परिवार, अमळनेर नगरपरिषद तसेच असंख्य शुभचिंतकांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. “मनमिळाऊ, जनसामान्यांचा नेता” म्हणून बबलू भाऊ पाठक यांचे कार्य असेच वृद्धिंगत व्हावे, समाजाच्या सेवेत त्यांना निरंतर यश मिळावे, हीच सर्वांची प्रार्थना.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!