माजी आमदार स्व. साथी गुलाबराव पाटील यांच्या स्मृतीनिमित्त वकृत्व स्पर्धा कार्यक्रमांचे आयोजन.

अपनी भाषा में पढ़े! Translate

माजी आमदार स्व. साथी गुलाबराव पाटील यांच्या स्मृतीनिमित्त वकृत्व स्पर्धा आणि  कार्यक्रमांचे आयोजन.

 

अमळनेर : पत्रकार, विक्की जाधव

तालुक्यातील जनतेच्या मनात कायमची जागा निर्माण केलेले माजी आमदार स्व. साथी गुलाबराव पाटील यांच्या स्मृतीनिमित्त अभंग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. “शेतकऱ्यांचे खरे सोबती” म्हणून ख्याती असलेल्या गुलाबराव पाटील यांनी आपल्या कार्यकाळात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या अटळ जिद्दीमुळे आणि धडाडीमुळे आजही खान्देशच्या जनमानसात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

२४ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, अमळनेर येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली असून “आज गांधीजी अवतरले तर?”, “कृत्रिम बुद्धिमत्ता: आवश्यकता की आव्हान?” यांसारख्या विषयांवर विद्यार्थी विचारमंथन करणार आहेत. तर २५ ऑगस्ट रोजी त्याच ठिकाणी मुख्य कार्यक्रम होणार असून स्मृतीचिन्ह, रोख पुरस्कार व विविध सन्मानाने कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

या दोन दिवसीय स्मृतिसोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, लेखक व अभ्यासक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. प्रेरणादायी भाषणे, पुरस्कार वितरण आणि उत्स्फूर्त आठवणींच्या माध्यमातून पाटील यांच्या कार्याचा उजाळा दिला जाणार आहे. खरं तर, हा स्मृतिसोहळा केवळ एक औपचारिकता नसून ग्रामीण जनतेच्या आयुष्याला दिशा दाखवणाऱ्या नेत्याला वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

 

मार्मिक ची खद:खद:

कोणालाही न विसरणारे बापू ती’ व्यक्ती  समोर आल्यावर त्याचं नाव सहित सांगत..  अशी माजी आमदार स्व. गुलाबराव बापू यांची ख्याती होती परंतु त्यांच्या विचारांवर चालणारे मोजक्यांचेच साथी होत आहेत का असाही प्रश्न थोडक्यात आहे. #पत्रकारपरिषद

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!