कॅमेऱ्यास अभिवादन, निसर्गास नमन – अमळनेरात तालुका फोटोग्राफर असोसिएशनचा उपक्रम

अपनी भाषा में पढ़े! Translate

कॅमेऱ्यास अभिवादन, निसर्गास नमन – अमळनेरात तालुका फोटोग्राफर असोसिएशनचा उपक्रम..

 

अमळनेर : विक्की जाधव

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे “कॅमेरा पूजन व वृक्ष लागवड” हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. आज (१९ ऑगस्ट) सकाळी १० वाजता पत्रकार भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला छायाचित्रकार बांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  चेतन राजपूत यांनी भूषविले. पत्रकार संजय पाटील, जेष्ठ फोटोग्राफर भगवान वारुळे व मुक्तार अली सय्यद यांच्या हस्ते कॅमेरा पूजन संपन्न झाले. त्यानंतर भगवान वारुळे यांच्या हस्ते पत्रकार भवन परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.या वेळी अध्यक्ष चेतन राजपूत म्हणाले की, “फोटोग्राफी ही समाजाचा आरसा आहे. प्रत्येक घटना, भावना व क्षण छायाचित्रकार आपल्या कॅमेऱ्यात टिपून ठेवतो. पत्रकार व फोटोग्राफर बांधव हे नेहमीच खांद्याला खांदा लावून काम करतात.

अशा सामाजिक उपक्रमांतून फोटोग्राफर असोसिएशनने संवेदनशीलतेचे दर्शन घडवले, हे कौतुकास्पद आहे.” पत्रकार संजय पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “कॅमेऱ्यात टिपलेला प्रत्येक क्षण हा इतिहासाचा दस्तऐवज ठरतो. समाजमन घडविण्यात फोटोग्राफर बांधवांचे योगदान अमूल्य आहे.” जेष्ठ फोटोग्राफर भगवान वारुळे यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, “छायाचित्रण ही माझ्यासाठी साधना आहे. कॅमेरा पूजनातून त्याचे महत्व अधोरेखित झाले, तर वृक्ष लागवडीमुळे निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ झाले.”

फोटोग्राफर असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते :

अध्यक्ष – महेंद्र पाटील, सचिव – दिपक बारी, खजिनदार – मनोज चित्ते, विक्की जाधव, डॉ. युवराज पाटील, जयवंत ढवळे, अनंत पाटील, सचिन बडगुजर, किरण बागुल, घनशाम पाटील, गणेश पाटील, फारुख पठाण, इक्बाल शेख, प्रवीण पाटील, नितीन भावसार, सागर चित्ते, भास्कर पाटील, जिजावराव महाजन, पप्पू पाटील, गणेश नाईक, अजय भोई, गुलाब पाटील, किशोर पाटील, कल्पेश पाटील, ज्ञानेश्वर देशमुख, मकसूद अली सय्यद, गजानन पाटील, दिपक सोनार, गौरव शुक्ल, विशाल चौधरी, अरविंद महाजन, नितीन पाटील, नारायण मिस्त्री आदींसह अनेक फोटोग्राफर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. युवराज पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन महेंद्र पाटील यांनी मानले.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!