राजवड आदर्शगावात ढगफुटीचा तडाखा – शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान..
अमळनेर : विक्की जाधव
पारोळा तालुक्यातील राजवड आदर्शगाव येथे सलग दोन दिवस अतिवृष्टी/ढगफुटी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 12 ते 2 च्या सुमारास तब्बल 86.3 मिमी पाऊस, तर दुसऱ्या दिवशी 17 ऑगस्ट रोजी पहाटे 1 ते 2.30 या वेळेत 127 मिमी पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वहात सुटले. गावातील घरांमध्ये, शिवारात तसेच शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले.

प्रचंड पावसामुळे शेतजमिनी खरडून वाहून गेल्या असून, उभी पिके उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्याची मागणी केली आहे.