लिंगाळी लोंढे मळा येथे ग्राम सुरक्षा दलास साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड (लिंगाळी)-
दौंड तालुक्यातील लिंगाळी ग्रामपंचायत येथे संभाजी सर्जेराव लोंढे व पोलीस पाटील सौं निता दिपक वाघमारे यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्राम सुरक्षा दलास रात्री पहारा करतेवेळी लागणारे काठी बॅटरी, शिट्टी साहित्य वाटप कार्यक्रम दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता पार पाडला यावेळेस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दौंड चे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार उपस्थित होते,तसेच दौंड पोलीस स्टेशनचे निखिल जाधव , अमीर शेख तसेच या कार्यक्रमाला आवर्जून अरुण साबळे अध्यक्ष तंटामुक्ती लिंगाळी गाव माळवाडी पोलीस पाटील रमेश झगडे यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रम हा लक्ष्मी नगर लोंढे मळा लिंगाळी या ठिकाणी संपन्न झाला तसेच हा कार्यक्रम लक्ष्मी नगर लोंढे मळा लिंगाळी ग्राम सुरक्षा दल यांनी आयोजित केला होता.
पासलकर वस्ती ग्राम सुरक्षा दल,
बालाजी नगर ग्रामसुरक्षा दल,
वेताळ नगर ग्रामसुरक्षा दल,
लिंगाळी ग्राम सुरक्षा दल
लक्ष्मी नगर लोंढे मळा ग्राम सुरक्षा दल,
साबळे / पाचुणकर वस्ती ग्राम सुरक्षा दल
साईनगर ग्राम सुरक्षा दल,
वरील सर्वांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते.कार्यक्रमासाठी गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.