पालकमंत्र्यांचा ताफा आडवणाऱ्याला पोलिस अधिकऱ्याने मारली लाथ, व्हिडिओ व्हायरल!

अपनी भाषा में पढ़े! Translate

पालकमंत्र्यांचा ताफा आडवणाऱ्याला पोलिस अधिकऱ्याने मारली लाथ, व्हिडिओ व्हायरल!

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव 

स्वातंत्र्य दिनी मोठी खळबळ माजली. अनेक दिवसांपासून आरोपी सापडत नाहीत या संदर्भात एकाची तक्रार होती. या पार्श्वभूमीवर काल जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या ताफ्याला एका व्यक्तीने अडवले. पोलिसांनी तत्काळ त्याला अटक केली. मात्र अटक झालेल्या व्यक्तीस पोलिस घेऊन जात असताना संतापजनक प्रकार घडला.

एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला रोडवर कमरेत लाथ घातली. हा प्रसंग नागरिकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल झाला.

या घटनेवर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. “कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनीच रस्त्यावर न्यायाचा भंग केला” अशी टीका होत असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

दरम्यान, या प्रकरणाला राजकीय रंग चढू लागला असून विविध संघटनांकडून इशारे देण्यात येत आहेत की, आरोपीवर कारवाई थांबवू नका, पण पोलिसाची गुंडगिरीही चालणार नाही. स्वातंत्र्य दिनासारख्या ऐतिहासिक दिवशी घडलेली ही घटना जालन्याच्या पोलीस यंत्रणेला धक्का देणारी ठरत आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!