सुरंगली येथे ग्रामपंचायत,जि.प.प्राथमिक शाळा , काशी विश्वेश्वर विद्यालय स्वातंत्र्य चां अमृत महोत्सव निमित्ताने ध्वजारोहण संपन्न.

सुरंगली । वार्ताहर । भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथे ग्रामपंचायत कार्यालय,जि.प.प्रा.शाळा, काशी विश्वेश्वर विद्यालय येथे स्वातंत्र्य दिनाच्या महोत्सव निमित्ताने दिनांक 13 ऑगस्ट,14 ऑगस्ट,15 ऑगस्ट रोजी तीन दिवस घर घर तिरंगा हरघर तिरंगा स्वातंत्र्याचां महोत्सव साजरा करण्यात आला. ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर माऊली यांच्या जयंतीनिमित्त 750 वर्षा महोत्सव जयंती निमित्त जि.प.शाळा काशी विश्वेश्वर विद्यालय पसायदान घेण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य गित घेण्यात आले.ग्रामपंचायत कार्यालय येथे दिनांक 13 ऑगस्ट रोजी उपसरपंच श्रीमती शेख शमाबी शे.रुबाब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जि.प.प्रा.शाळा 13 ऑगस्ट रोजी मुख्याध्यापक राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. काशी विश्वेश्वर विद्यालय येथे 13 ऑगस्ट रोजी माजी उपसरपंच तथा अध्यक्ष संजय वामनराव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, दिनांक 14 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे श्रीमती सुनयना ज्ञानेश्वर वानखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ,जि.प.प्रा.शाळा सौ.अनिता अण्णा काळे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. काशी विश्वेश्वर विद्यालय येथे माजी सरपंच तथा संचालक संजीव रामचंद्र पाटील पत्रकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 15 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच सौ. सुनिता संतोष काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जि.प.प्रा.शाळा येथे शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष विष्णु साक्रुबा दांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. काशी विश्वेश्वर विद्यालय येथे अध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास ग्रामसेवक पाजगे , विनोद सेठ जाधव माजी उपसरपंच, माजी सरपंच पत्रकार संजीव पाटील, माजी उपसरपंच विश्वनाथ पाटील जाधव,माजी उपसरपंच संजय पाटील,शेख समद भै .शेख अहमद, माजी उपसरपंच शेख रुबाब भै , संतोष काळे,धनराज काळे, पत्रकार सुभाष वर्पे, संजय दांडगे, ग्रामरोजगार सेवक दादाराव दांडगे, घनश्याम बोर्डे, जि.प.शाळचे मुख्याध्यापक राठोड सर , काशी विश्वेश्वर विद्यालय चे मुख्याध्यापक अवचितराव सपकाळ, जि.प.शाळेचे सहशिक्षक घांगे बावस्कर, अंभोरे, गिरी, घांगे केंद्रप्रमुख दानापुर सोळुंके . काशी विश्वेश्वर विद्यालय चे सह शिक्षक येवले, गावीत. सिरसाठ, अंगणवाडी सेविका मंदाताई संजीव पाटील ,उषाबाई किरणं खोंडे, आरोग्य सेविका सपकाळ, मदतनीस श्रीमती सविता प्रभाकर घोडके ,श्रीमती निर्मला जाधव , आशा सेविका,सौ.सरला अशोक जाधव , श्रीमती वनिता साहेब राव इंगळे, सौ.सरला रामदास टोंपे, पोलिस पाटील संजय तुकाराम दांडगे, माजी उपसरपंच एकनाथराव भराड संगणक परीचालक संदीप मोतीराम दांडगे, ग्रा.प.शिपाई अरुण गवळी,कृष्णा गवळी, सुरेश लोखंडे, यांच्या सह अनेक गावकरी ध्वजारोहण कार्यक्रमसाठी उपस्थित होते. जि.प.प्रा.शाळा,ग्रा.प.कार्यालय येथे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह शिक्षक गिरी यांनी केले.काशीविश्वेश्वर येथे विद्यार्थ्यांचा कवायती चां कार्यक्रम सादर करण्यात आला. काशी विश्वेश्वर विद्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक सिरसाठ यांनी केले. या कार्यक्रमात आरोग्य सेविका सपकाळ यांनी उपस्थित गावकरी, कर्मचारी यांना तंबाखू व्यसनमुक्ती ची शपथ दिली.