79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला प्रताप हायस्कूलतर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश आणि शैक्षणिक साहित्य वाटप
अमळनेर : विक्की जाधव
79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला प्रताप हायस्कूलतर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश आणि शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम पार पडला. देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा होत असताना शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा हा छोटासा पण मोलाचा प्रयत्न ठरला.

संस्थेचे चिटणीस प्रा. पराग पाटील यांनी स्वेच्छेने गणवेश उपलब्ध करून दिले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप केले.या प्रसंगी सचिव, मुख्याध्यापक निकम सर, चंद्रकांत कंखरे सर, किरण सनेर सर, कल्पेश सुर्यवंशी सर, कृष्णा कोळी सर, विनोस पाटील सर यांच्यासह सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.