“शब्दांच्या शस्त्राने समाजजागृती करणारे अण्णाभाऊ” — सुनीता मोरे यांचे विद्यार्थ्यांना स्फूर्तीदायी प्रतिपादन

अपनी भाषा में पढ़े! Translate

“शब्दांच्या शस्त्राने समाजजागृती करणारे अण्णाभाऊ” — सुनीता मोरे यांचे विद्यार्थ्यांना स्फूर्तीदायी प्रतिपादन

 

अमळनेर : विक्की जाधव 

“शोषितांचं दुःख सांगणारा, अन्यायाविरुद्ध ठाम उभा राहणारा आवाज म्हणजे अण्णाभाऊ साठे. त्यांच्या लेखणीतून झळकणारी क्रांती आजही नव्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे,” असे सामाजिक कार्यकर्त्या सुनीता मोरे यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडले.

युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत एन. टी. मुंदडा हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण आणि पूजनाने झाली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नरेंद्र पाटील होते.

सुनीता मोरे यांनी अण्णाभाऊंचा जीवनप्रवास सखोलतेने उलगडताना त्यांच्या कथाकाव्यातून उठून दिसणाऱ्या सामाजिक वास्तवाचा वेध घेतला. त्यांच्या गाण्यांमधून संवाद साधत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तनाची जाणीव जागवली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्यावर भाषण सादर करून ऐतिहासिक विचारांची उजळणी केली. शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून विचारप्रवाहात भाग घेतला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!