लोकमान्य शिक्षण मंडळाचा हीरक महोत्सव..

अपनी भाषा में पढ़े! Translate

लोकमान्य शिक्षण मंडळाचा हीरक महोत्सव..

 

अमळनेर : विक्की जाधव 

दि. 01 ऑगस्ट – येथील लोकमान्य शिक्षण मंडळाचा 60 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी नवीन मराठी शाळा व बाल विकास मंदिर या दोन्ही शाळांतर्फे संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यात संस्थेचा इतिहास, वर्तमान वाटचाल व भविष्यातील धोरणाविषयी विद्यार्थी व पालकांना माहिती देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. मा. श्री. डी. डी. पाटील सर व संस्थेचे चिटणीस मा. श्री विवेकानंद भांडारकर सर यांनी आपल्या संस्थेविषयीच्या भावना व्यक्त केल्या.नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री अतुल भोई सर यांनी शाळेच्या भविष्यातील धोरणांविषयी माहिती दिली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. वर्धापन दिन कार्यक्रमासोबतच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्त भाषणाचा कार्यक्रम करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहात भाषणे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वल मार्कंडेय सर यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!