पैसे दुप्पट, नपुसकतेचा राग की अजून काही? – अमळनेर दुहेरी खून प्रकरणात आरोपीकडून गुन्ह्यांची मालिका उघड

अपनी भाषा में पढ़े! Translate

पैसे दुप्पट, नपुसकतेचा राग की अजून काही? – अमळनेर दुहेरी खून प्रकरणात आरोपीकडून गुन्ह्यांची मालिका उघड

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : 

सुमठाणे व जानवे शिवारातील दुहेरी खून प्रकरणातील आरोपी अनिल संदानशीव याने चौकशीत आणखी काही धक्कादायक गुन्ह्यांची कबुली दिली आहे. अनेक महिलांशी त्याचे संभाषण झाल्याचे समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) तपासाची व्याप्ती वाढवत विशेष पथके वेगवेगळ्या दिशांनी रवाना केली आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिलच्या सतत बदलत्या जबाबांमुळे तपास अधिक गुंतागुंतीचा करत असून पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याने काही महिलांना पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली असल्याचेही निष्पन्न झाले आहे. सुरुवातीच्या जबाबांमध्ये त्याने महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात असफल ठरल्यानंतर त्या त्याला ‘नपुसक’ म्हणत हिणवायच्या, म्हणून रागाच्या भरात हत्या केल्याचे सांगितले होते.

पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली असून, मृत महिलेचे हाड व तिच्या मुलाचे रक्त नमुने डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, एलसीबीने आरोपीचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) मिळवून अधिक चौकशी केली असता, तो अनेक महिलांच्या संपर्कात होता हे समोर आले आहे. त्यामुळे आणखी किती महिलांशी त्याचे संबंध होते? त्या महिलांचे काय झाले? याचा तपास पोलीस करत आहेत.

या पार्श्वभूमीवर एलसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक अमळनेर येथे दाखल झाले असून, डीवायएसपी विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याशी समन्वय साधून हे पथके तपासासाठी रवाना करण्यात आली आहेत. आरोपीने संपर्क साधलेल्या महिलांचा उद्देश, त्यांचे सध्याचे ठिकाण व त्यांच्या सुरक्षेबाबतही तपास केला जात आहे.  या गुन्ह्याचा तपास जसजसा पुढे जातो आहे, तसतशी आरोपीच्या विकृत मानसिकतेची नवी रूपं समोर येत असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!