July 1, 2025 12:44 pm

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचा ९ लाख मे. टन गाळपाचा टप्पा पूर्ण- हर्षवर्धन पाटील..

अपनी भाषा में पढ़े! Translate

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचा ९ लाख मे. टन गाळपाचा टप्पा पूर्ण- हर्षवर्धन पाटील..

इंदापूर प्रतिनिधी- आदित्य बोराटे

    महात्मा फुलेनगर (बिजवडी ) ता. इंदापूर येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने चालु सन २०२१-२२ च्या गळीत हंगामामध्ये आज सोमवार दि.२८ फेब्रुवरी रोजी अखेर ९ लाख मे. टन ऊसाचे गाळप पूर्ण करून चालू हंगामातील महत्त्वाचा टप्पा पार केला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

  कारखान्याचा चालू गळीत हंगाम उत्कृष्ठपणे सुरु असून दररोज प्रतिदिनी सरासरी ८५०० मे. टना हुन अधिक क्षमतेने ऊसाचे गाळप केले जात आहे. कारखान्याचे सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प आदी उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प पुर्ण कार्यक्षमतेने चालु आहेत. कारखाना कार्यक्षेत्रामध्ये आंम्ही प्रारंभी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या गटनिहाय बैठका घेऊन सकारात्मक पद्धतीने मनमोकळे पणाने संवाद साधला.   सभासदांना आम्ही कारखान्यास हंगाम यशस्वी करणेस सहकार्य करणेचे आवाहन केले. ऊस पुरवठादार सभासद शेतकऱ्यांनीही कारखाना कामकाजाबाबत विधायक सुचना केल्या. सदर संवादाचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

 असेच सहकार्य या पुढील काळातही राहील्यास जरी काही अडचणी असल्या तरी कारखान्याची वाटचाल नक्कीच प्रगतीकडे राहिल अशी आशा त्यांनी व्यक्‍त केली.आज कारखान्याने ९ लाख में. टन ऊस गाळपाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केलेबद्दल संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक कंत्राटदार, मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी, कर्मचारी व हितचिंतक यांचे हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले.

कारखान्याची ऊस बिले, तोडणी वाहतूक बिले व कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर केले जात आहेत. चालू गळीत हंगामात १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवलेले आहे, असे त्यांनी सांगितले.चालु हंगामात सर्व उसाचे गाळप केले शिवाय कारखाना बंद केला जाणार नाही. कर्मयोगी कारखाना हा सहकाराचे मंदिर असून, आता सर्वांच्या सहकार्यामुळे कारखाना प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे, असेही याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, हनुमंत जाधव, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगन भोंगळे, प्रदीप पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, वसंत मोहोळकर, शारदा पवार, कांचन कदम, कार्यकारी संचालक देवराव लोकरे उपस्थित होते. 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!