लायन्स क्लब अमळनेरचा ५७ वा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला
अमळनेर : विक्की जाधव.
लायन्स क्लब अमळनेरचा ५७ वा स्थापना समारंभ दिनांक ६ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता हॉटेल मिडटाउन, सुभाष चौक येथे अत्यंत उत्साही वातावरणात आणि भव्यतेत पार पडला. या समारंभात ला.डॉ. संदीप जोशी यांची अध्यक्षपदी, ला.महेंद्र पाटील यांची सचिवपदी, तर ला.नितीन विनचुरकर यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. समारंभास माजी जिल्हापाल (२२३४-H2) लायन गिरीशजी सिसोदिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मुख्य वक्ता म्हणून मुंबईचे सुप्रसिद्ध लेखक, अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते मा. अशोकजी सामेल यांनी प्रेरणादायी भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी प्रादेशिक अध्यक्ष ला.चेतनजी बर्डीया आणि झोन अध्यक्ष MJF ला. विनोदजी अग्रवाल हेही मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते.

समारंभाचे आकर्षण म्हणजे आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्व सदस्यांची पारंपरिक वारकरी वेशभूषा, ज्यामुळे कार्यक्रमाला आध्यात्मिक व सांस्कृतिक रंग प्राप्त झाला. कार्यक्रमाची सांगता स्वादिष्ट भोजनासह सेवा, सौहार्द आणि सामाजिक बांधिलकीची नवी प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली.लायन्स क्लब चे सर्व पदाधीकारी व सदस्य उपस्थित होते.